मेष:-घरात शुभ कार्य ठरेल. वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल.

वृषभ:-लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल.

मिथुन:-विषयास अनुसरून बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. अपचनाचा त्रास संभवतो.

कर्क:-दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. घाईने काम बिघडू शकते.

सिंह:-मनाला न पटणार्‍या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल. तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. निष्काळजीपणे वागू नका. भावनात्मक निर्णय टाळावा.

कन्या:-स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.

तूळ:-अघळपघळ बोलू नका. स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल. जन संपर्कातून लाभ होईल.

वृश्चिक:-फसवणुकीपासून सावध रहा. झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका.

धनू:-समोरच्याचा मान ठेवून वागा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील. काळ आणि वेळ लक्षात घ्या.

मकर:-चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील रहा. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

कुंभ:-उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल. योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग.

मीन:-बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका. अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर