मेष:-तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्‍यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबासमवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.

वृषभ:-कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.

मिथुन:-हट्टीपणे वागू नका. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.

कर्क:-भागीदारीत फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.

सिंह:-दुसर्‍यास समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.

कन्या:-भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ:-इतरांशी व्यवहाराने वागाल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.

वृश्चिक:-अति साहस करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्‍याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

धनू:-तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर:-शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.

कुंभ:-गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.

मीन:-दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगति होईल. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर