27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान शोधाल. पित्ताचा त्रास जाणवेल. दिवस घाईगडबडीत जाईल. वेळेचे नियोजन करावे.
 • वृषभ:-
  कौटुंबिक सुखाला प्राधान्य द्याल. जमिनीचे व्यवहार चांगले होतील. हातात यथोचित पैसा खुळखुळेल. जवळची व्यक्ती विरोधात जावू शकते. कामाकडे चांगले लक्ष ठेवा.
 • मिथुन:-
  कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. घरासंबंधीच्या कामाकडे लक्ष द्यावे. मानहानीचे प्रसंग येवू शकतात. स्पर्धेत भाग घ्याल. जोडीदाराचा उत्कर्ष होईल.
 • कर्क:-
  आरोग्यात सुधारणा होईल. वरिष्ठांकडून कौतूक केले जाईल. धाडसाने कामे कराल. इच्छित सुख प्राप्ती होईल. कलेत मन रमवाल.
 • सिंह:-
  क्षुल्लक गोष्टींना फार अवास्तव महत्त्व देवू नका. आवाजात गोडवा ठेवाल. गायन कलेला उठाव मिळेल. आर्थिक गुंतवणूक सतर्कतेने करावी. आवडीला प्राधान्य द्याल.
 • कन्या:-
  रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. तुमच्यातील उर्जेचा वापर करावा. खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. कामातील प्रगतीकडे लक्ष द्यावे.
 • तूळ:-
  अकारण आलेली निराशा झटकून टाकावी. परदेश गमनाची संधी चालून येईल. काही कामांना खीळ बसू शकते. नसत्या गोष्टी उकरून काढल्या जावू शकतात. झोपेची तक्रार जाणवू शकते.
 • वृश्चिक:-
  उत्कृष्ट व्यावसायिक लाभ होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थैर्य लाभेल. मित्रांची उत्तम साथ लाभेल. अधिकारी व्यक्तींची उठबस वाढेल.
 • धनु:-
  तुमच्या आकांक्षांची पूर्ती होईल. हातात पैसा खुळखुळेल. बक्षिसास पात्र व्हाल. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. नवीन ओळखी वाढतील.
 • मकर:-
  वडिलधाऱ्यांचा विरोध होवू शकतो. आपले पद सांभाळावे. अचानकपणे आलेल्या गोष्टींना सामोरे जावे लागेल. इतरांना मदत करावी. मनातील भीती काढून टाकावी.
 • कुंभ:-
  आरोग्याची हेळसांड करून चालणार नाही. चुकीच्या लोकांशी संपर्क ठेवू नयेत. सावधानतेने विचार करावेत. मनातील गैरसमज दूर करावेत. हेकेखोरपणा बाजूला सारावा.
 • मीन:-
  जोडीदाराच्या प्रगतीने भारावून जाल. वैवाहिक सौख्याला बहर येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. भागीदारीत समाधानी असाल. प्रेमसंबंध दृढ होईल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 29 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, २८ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २७ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ सप्टेंबर २०१९
Just Now!
X