मेष
आज देवाला दुध भाताचा नेवैद्य दाखवून कामांची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडी- अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – नारंगी

वृषभ
ओम द्रां गुरवे नम: आज या नामाचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग- हिरवा

मिथुन
ओम आदित्याय नम: या मंत्राचा जप करुन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावे. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- पांढरा

कर्क
पशुपक्षांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पति, पत्नीमधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग- पिवळा

सिंह
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहाने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- गुलाबी

कन्या
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदायी ग्रहमान राहिल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – लाल

तुळ
पशुपक्षांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान राहिल. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग- पांढरा

वृश्चिक
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कम्युडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग- आकाशी

धनु
कुलदैवतांचे पुजन करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहिल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कम्युडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग- तपकिरी

मकर
महादेवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टीने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- नारंगी

कुंभ
ओम नम: शिवाय या मंत्राच जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राची निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- राखाडी

मीन
कालभैरवाचे दर्शन घ्यावे, दानधर्म करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहिल. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu