1. मेष:-
    आज दिवसभर कार्यरत राहाल. बोलण्यात मधाळपणा बाळगावा. कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका. गणपतीची उपासना करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल.
  2. वृषभ:-
    गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. चांगली पुस्तके वाचनात येतील. सहकार्‍यांची मदत घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.
  3. मिथुन:-
    अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा.
  4. कर्क:-
    महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक करा. समोरील व्यक्तीशी वाद टाळावा. अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. दिवस अनुकूल जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
  5. सिंह:-
    बौद्धिक चातुर्य दर्शवाल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे. हलका आहार घ्यावा. आध्यात्मिक प्रगती करता येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.
  6. कन्या:-
    मित्रांची मदत होईल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. नातेवाईकांचा रूसवा काढावा लागेल. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
  7. तूळ:-
    समाधानी दिवस असेल. नवीन कामात समाधानी राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील.
  8. वृश्चिक:-
    आळस झटकून कामाला लागावे. दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल. आर्थिक पातळीवर समाधान मिळेल. समोरील संधीचे सोने करावे. कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते.
  9. धनू:-
    हातून सेवा घडेल. घरगुती कामे जलदगतीने पार पडतील. जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी. पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते.
  10. मकर:-
    दिवसभर कामात व्यग्र राहाल. घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. चिकाटीने व प्रामाणिकपणे कामे कराल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.
  11. कुंभ:-
    काही गोष्टी अधिकारवाणीने सांगाव्यात. नवीन ओळखी सत्कारणी लागतील. भागीदारीत खूश असाल. नवीन विचारांना चालना द्यावी. मित्र जपून ठेवावेत.
  12. मीन:-
    कौटुंबिक शांतता बाळगावी. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. व्यायामाचे फायदे लक्षात घ्या. व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर