मेष
कणकधारा स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंडे आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
श्री आदि गुरवैय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – राखाडी

मिथुन
गणेश अष्टकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क
गुरूचरित्र पारायण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – लाल

सिंह
श्री गुरूनाथाय नम: हा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – लाल

कन्या
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – क्रीम

वृश्चिक
दिवसभर गुरू स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – निळा

धनु
गुरू मंत्र जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पांढरा

मकर
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अन्नदान करणे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठी निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
पुरूष सुक्तचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकला. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग- नारंगी

मीन
श्री गुरूवे नम: या नामाचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावीत. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu