• मेष:-
    मानसिक व्यग्रता जाणवेल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलेच्या दृष्टीने अधिक चोखंदळ राहावे. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. आद्योगिक वातावरण चांगले राहील.
  • वृषभ:-
    मनातील इच्छा बोलून दाखवाल. मित्रांच्यात वावराल. किरकोळ खरेदी केली जाईल. दिवस काहीसा आळसात घालवाल. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल.
  • मिथुन:-
    सामाजिक वजन वाढेल. कामात एकसूत्रता ठेवावी. चंचलतेवर मात करावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. घरातील कामात हातभार लावाल.
  • कर्क:-
    धार्मिक स्थळांना भेट द्याल. मदतीचे समाधान मिळेल. नवीन कल्पना मनात रूजतील. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
  • सिंह:-
    फार विचार करत बसू नये. अचानक धनलाभ संभवतो. शेअर्स, सट्टा यातून फायदा संभवतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे. कामात आधिक कष्ट घ्यावे लागतील.
  • कन्या:-
    भागीदारीत चांगला लाभ होईल. नातेवाईकांची अडचण समजून घ्याल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. तुमच्यावर नवीन काम सोपवले जाईल. कामाचे कौतुक केले जाईल.
  • तूळ:-
    उगाच कोणाशीही शत्रुत्व घेऊ नका. वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तिखट व तामसी पदार्थ खाल. बोलताना भान राखावे.
  • वृश्चिक:-
    अडचणींवर मात करावी. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्यावे. निराशेला बळी पडू नका. किरकोळ जखमा होऊ शकतात. वाढता खर्च लक्षात घ्यावा.
  • धनु:-
    कामे वेळेवर पूर्ण करावीत. चित्तचांचल्य जाणवेल. योग्य संगतीत राहावे. आर्थिक गुंतवणूक जपून करावी. मित्रांच्या मताचा आदर करावा.
  • मकर:-
    जवळचा प्रवास करावा लागेल. चैनीत दिवस घालवाल. झोपेची तक्रार राहील. आध्यात्मिक बळ वाढवावे. गोष्टी मानाजोग्या घडतील.
  • कुंभ:-
    गोड पदार्थ चाखाल. कामातील बदल लक्षात घ्यावा. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. नवीन ओळखी होतील. बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे.
  • मीन:-
    मानसिक अस्थिरता जाणवेल. मनातील इच्छेला महत्व द्यावे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहावे. वडीलधाऱ्यांशी सुसंवाद साधावा. कामाला चांगले वळण मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर