19 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:-
  गेले काही दिवस झालेली चिडचिड कमी होईल. मनोरंजनात्मक वाचन होईल. आजचा दिवस चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. तुमच्यातील उत्साह वाढेल.
 2. वृषभ:-
  मित्र व नातेवाईक कौतुक करतील. कामे सुरळीत पार पडतील. हस्तकलेला वाव मिळेल. सामाजिक जाणीव जागृत ठेवाल. सरकारी नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी राखावी.
 3. मिथुन:-
  जिव्हाळ्याची व्यक्ति भेटेल. अनावश्यक खर्च कराल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. अधिकाराचा योग्य वापर करता येईल.
 4. कर्क:-
  अतिघाई करू नये. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. स्वविचारात मग्न राहाल. जवळच्या व्यक्तींशी संपर्कातून चांगला मार्ग निघेल. हौस भागवण्यावर खर्च कराल.
 5. सिंह:-
  कामाचा ताण जाणवेल. योग्य गुंतवणुकीला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. संपर्कातील लोकांशी चांगला संवाद साधला जाईल. सकारात्मकता अंगी बाणवा.
 6. कन्या:-
  दिवस उत्तम जाईल. घरातील अडकलेली कामे मार्गी लागतील. झोपेची किरकोळ तक्रार जाणवेल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. बोलण्यावर संयम ठेवा.
 7. तूळ:-
  करमणूक प्रधान दिवस. मनातील इच्छा पूर्ण होईल. अधिकाराची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कौटुंबिक गोष्टी समजूतदारपणे हाताळा. लबाड लोकांपासून दूर राहावे.
 8. वृश्चिक:-
  घरगुती कामे करण्यात वेळ जाईल. नवीन विचारांना चालना मिळेल. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मोठ्या मनाने गोष्टींकडे पहाल.
 9. धनू:-
  रखडलेल्या कामात मदत मिळेल. अर्थाचा अनर्थ करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यावसायिक येणी मिळतील. नवीन ओळखी होण्याची शक्यता.
 10. मकर:-
  बोलण्यातून गैरसमज टाळा. घरासाठी थोडी जास्त खरेदी होईल. भावंडांशी संवाद साधावा. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आपले काम भले व आपण भले असे राहावे.
 11. कुंभ:-
  दिवस इच्छेप्रमाणे घालवाल. बोलण्यावर संयम ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
 12. मीन:-
  घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. मन विचलीत होऊ शकते. उगाच त्रागा करू नका. प्रेमात संयम बाळगावा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2020 12:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 03rd september 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०२ सप्टेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ३१ ऑगस्ट २०२०
Just Now!
X