News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  तुमच्यातील कल्पनाशक्तीला भरारी येईल. आकांक्षांना मूर्त रूप मिळेल. जवळच्या मित्रमंडळीत रमून जाल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. सुखासक्तपणा जाणवेल.
 • वृषभ:-
  दिवस धावपळीत व्यतीत होईल. दर्जेदार कामाची पावती मिळेल. कामाच्या पद्धतीत बदल करू नका. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. कामाला योग्य दिशा मिळेल.
 • मिथुन:-
  सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. सूचक स्वप्न पडतील. धार्मिक कामात मदत कराल. इतरांना मदत करण्यात समाधान मानाल. सांपत्तिक दर्जा सुधाराल.
 • कर्क:-
  अतिविचार करू नये. चुकीच्या कामात हात घालू नका. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. काही गोष्टी अकस्मात सामोऱ्या येतील. मनातील भीती बाजूला सारावी.
 • सिंह:-
  जोडीदाराची बाजू समजून येईल. भागीदारीत चांगला फायदा होईल. पत्नीच्या प्रेमळपणाची जाणीव ठेवाल. सहकुटुंब प्रवास कराल. मनाची चंचलता दूर करावी.
 • कन्या:-
  वैचारिक ठामपणा ठेवायला हवा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. परिस्थितीला नवे ठेवू नका. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका. वाताचा त्रास जाणवेल.
 • तूळ:-
  चटकन रागावू नका. उत्साहाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करणे आवश्यक आहे. जोमाने कामे करून दाखवाल. अडथळ्यातून मार्ग निघेल.
 • वृश्चिक:-
  उष्णतेचा त्रास जाणवेल. कर्ज प्रकरणे काही काळ दूर ठेवावीत. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. गैरसमजातून त्रास होऊ शकतो.
 • धनु:-
  मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्याल. आर्थिक बाबतीत खटपटी राहाल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. मित्रांशी वादात पडू नका. सर्वांशी गोड बोलून कामे करावीत.
 • मकर:-
  व्यावसायिक बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण शांत ठेवावे. वाहन चालवितांना सतर्क राहावे. एकाच बाजूने विचार करू नका. जुन्या गोष्टींचा विचार मनातून काढून टाकावा.
 • कुंभ:-
  शक्तीची उपासना करावी. तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात. शक्तीने कामे करण्याकडे कल राहील. प्रवासात काळजी घ्यावी. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल.
 • मीन:-
  लहान-सहन दुखपतींकडे दुर्लक्ष करू नका. भाजणे, कापणे यांसारखे त्रास संभवतात. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पत्नीचा हट्ट पुरवाल. एकमेकातील गैरसमज दूर करावेत.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 05 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०४ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०३ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०२ डिसेंबर २०१९
Just Now!
X