25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  अचानक धनलाभ संभवतो. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. खेळ खेळण्यात रममाण व्हाल. मैत्री अधिकार गाजवाल. सल्लामसलत करावी.
 • वृषभ:-
  जोडीदाराच्या निर्णयाचे कौतुक कराल. कौटुंबिक कार्यात मदत कराल. काही अपेक्षांना मुरड घालून पहावी. बागबगीच्याच्या कामाचा आनंद घ्याल. किरकोळ कुरबुरी दूर कराव्यात.
 • मिथुन:-
  बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य लाभेल. कामाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष द्यावे. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. वाचनाची आवड जोपासाल.
 • कर्क:-
  आर्थिक आघाडीवर सुधारणा करता येईल. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळतील. घरात आशादायी वातावरण असेल. भावनेच्या आहारी जावू नका. जाणीवपूर्वक वागाल.
 • सिंह:-
  महत्त्वाचे निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरेल. कौटुंबिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. अधिक उत्साहाने कामे कराल. कामानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात.
 • कन्या:-
  काही वैयक्तिक प्रश्न सामोरे येतील. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सामाजिक वादविवादात अडकू नका. जुनी बिले चुकती कराल. जामिनीचे व्यवहार जपून करावेत.
 • तूळ:-
  ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच कराव्यात. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल. आपले आणि परके यांच्यातील फरक जाणून घ्या. प्रलंबित बिले चुकती कराल. कामे लवकर उरकण्याचा प्रयत्न करावा.
 • वृश्चिक:-
  इतरांबरोबर आनंद वाटून घ्याल. आरोग्यात सुधारणा होईल. गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला घ्यावा. मुलांच्या यशाचा अभिमान वाटेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होईल.
 • धनु:-
  तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्यात. आवडत्या छंदांमध्ये स्वत:ला गुंतवा. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांशी चर्चा करतांना शब्द जपून वापरा. पारमार्थिक उन्नतीचा विचार करावा.
 • मकर:-
  जुन्या गोष्टी उकरुन काढू नयेत. प्रसंगानुरूप वागावे लागेल. आळस झटकून कामाला लागावे. अनावश्यक खर्च टाळावेत. विषय फार ताणू नयेत.
 • कुंभ:-
  जोडीदाराच्या प्रेमळपणात भर पडेल. नवे मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक गोष्टी लाभदायक घडतील. नवीन अधिकाराची चुणूक लागेल. योग्य दर्जा संपादन कराल.
 • मीन:-
  आध्यामिक बाजू सुधाराल. तुमच्या हातून चांगले लिखाण होईल. वैचारिकता सुधार करता येईल. बुद्धीच्या जोरावर कामे मिळवाल. सामाजिक सेवेचे महत्त्व जाणाल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on September 5, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 05 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०४ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०३ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०२ सप्टेंबर २०१९
Just Now!
X