05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०७ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  उत्तम वाहन सौख्य लाभेल. मित्रांमध्ये कौतुक केले जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो.
 • वृषभ:-
  हातातील अधिकार वापरावेत. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. काही गोष्टी वेळेनुसार बदलाव्या लागतील. तुमच्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. घरातील कामे सुरळीत पार पडतील.
 • मिथुन:-
  इतरांचा विश्वास संपादन करावा. कामाव्यतिरिक्त इतरत्र लक्ष घालू नका. मनाची द्विधावस्था टाळावी. आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे.
 • कर्क:-
  मानसिक ताण जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नये. नवीन मित्र जोडाल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
 • सिंह:-
  बोलताना शब्द जपून वापरावेत. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मित्रांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. घरातील कामात रस घ्याल.
 • कन्या:-
  अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. आर्थिक प्रश्न आधी विचारात घ्यावा. गायन कलेत रमून जाल. हातातील कौशल्य दाखवाल. भडक शब्द वापरू नका.
 • तूळ:-
  वेळेचे योग्य नियोजन करावे. आवडत्या वस्तू खरेदी कराल. सर्वांना गोड बोलून आपलेसे कराल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. मानापमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका.
 • वृश्चिक:-
  झोपेची तक्रार जाणवेल. मैत्रीचे संबंध सुधारावेत. दिवस मजेत घालवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आर्थिक गणित जुळून येईल.
 • धनु:-
  जवळचा प्रवास मजेत होईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. भावंडांना मदत कराल. जुने विचार बाजूला सारावे. फसवणुकीपासून सावध राहावे.
 • मकर:-
  पत्नीचा हट्ट पुरवाल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. आवडीचे पदार्थ खाल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
 • कुंभ:-
  दिवस मानाजोगी व्यतीत कराल. कमिशन मधून फायदा संभवतो. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करावे. योग्य संधीची वाट पाहावी. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो.
 • मीन:-
  मुलांचे प्रश्न जाणून घ्यावेत. मनाची द्विधावस्था टाळावी. अकारण चिडचिड होईल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. चुकीच्या लोकांच्या सहवासात अडकू नका.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 07 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०६ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०४ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X