मेष

ॐ समर्थाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठे आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –ऑफ व्हाइट

वृषभ

ॐ महेशाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदारामंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पिवळा

मिथुन

ॐ गिरीधराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ मधुसुदनाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. संतती सौख्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग –पोपटी

सिंह

ॐ जयवंताय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बांधकाम व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग -हिरवा

कन्या

ॐ अंजनीसुताय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायामध्ये स्पर्धा वाढेल. सहकार्यांचे सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायात नवीन गोष्टी करू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –जांभळा

तुळ

ॐ त्रिविक्रमाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करता येतील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. नोकरदारांना प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

ॐ वैकुंठाधिपतये नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. भाग्यकारक घटनांचा दिवस. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंड शेतीशी निगडीत व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहे. हितसंबंध दृढ करता येतील.
आजचा रंग –तपकिरी

धनु

ॐ गणाधिशाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
आजचा रंग – पांढरा

मकर

ॐ हरिरूपाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

कुंभ

ॐ गजाननाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल.
आजचा रंग-राखाडी

मीन

ॐ व्यंकटेश्वराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना, नोकरदारमंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग –तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu