मेष:- लहान प्रवास कराल. मानसिक दोलायमानता जाणवेल. आपला ठामपणा टिकवून ठेवा. गैरसमजाला मनातून दूर सारा. इच्छा जागृत ठेवावी. वृषभ:- आवडीच्याबाबत कसूर करू नका. चित्त एकाग्र ठेवावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांच्या मताचा आदर करावा. प्रक्रृतीची काळजी घ्यावी. मिथुन:- मनाची चंचलता जाणवेल. पोटाची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार जाणवतील. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. कर्क:- शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. नवीन संधीची वाट पाहावी. अपचनाचा त्रास जाणवेल. मुलांकडून विरोध होऊ शकतो. हातातील कामात यश येईल. सिंह:- उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. कौतुकास पात्र व्हाल. वाहन विषयक प्रश्न सुटतील. एखादे नवीन वाहन खरेदीचा विचार करावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. कन्या:- उत्तम गृहसौख्य लाभेल. कामातून चांगली प्राप्ती होईल. नवीन मित्र जोडता येतील. अपेक्षांना आवर घालावी. अधिकाराची जाणीव ठेवा. तूळ:- शब्द जपून वापरावेत. खर्चाचा मेळ घालावा लागेल. कोणाविषयी मनात द्वेष बाळगू नका. वादाचे मुद्दे बाजूला सारा. फसवणुकीपासून सावध राहावे. वृश्चिक:- किरकोळ जखमांकडे लक्ष द्या. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पेलाल. कष्टाशिवाय पर्याय नाही. समाधानकारक आर्थिक लाभ होईल. धनु:- कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढावा. फार काळजी करत बसू नका. प्रवासात काळजी घ्यावी. घरात काही बदल करून पहावेत. खर्चाचा ताळमेळ घालावा. मकर:- प्रवासात खर्च वाढेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कामानिमित्त दूर गावी जावे लागेल. खंबीरपणे विचार करावा. कागदपत्रे जपून ठेवावीत. कुंभ:- दिवस प्रसन्नतेचा राहील. सर्वांशी आनंदाने वागाल. नवीन मित्र जोडावेत. प्रयत्नात कसूर करू नका. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना फायदा होईल. मीन:- घरातील थोरांचा विरोध लक्षात घ्यावा. प्रवास जपून करावा. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कौटुंबिक सौख्य वाढेल. कमिशनमधून लाभ होईल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर