08 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १० ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  उत्तम आर्थिक लाभ संभवतो. जवळचे मित्र भेटतील. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. स्त्री समुहात वावराल. पोटाच्या विकारांवर वेळीच उपचार करावा.
 • वृषभ:-
  सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात स्थिरता ठेवावी. तुमच्या कामाच्या पध्दतीचे कौतुक केले जाईल. कामानिमित्त प्रवास घडून येईल.
 • मिथुन:-
  धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक बांधिलकी जपाल. शैक्षणिक कामात यश येईल. कल्पनाशक्तिला चांगला वव मिळेल. बौध्दिक चुणूक दाखवाल.
 • कर्क:-
  मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चुकीच्या कामात हात घालू नका. काही गोष्टी आकस्मिक घडतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी.
 • सिंह:-
  दिलेल्या पैशांची वसूली होईल. काही आर्थिक अडचणी सुटतील. हातातील​कलेचे कौतूक केले जाईल. भांडणात अडकू नये. प्रवासाचा आनंद लुटावा.
 • कन्या:-
  दगदग वाढण्याची शक्यता आहे. कामात उत्साह जाणवेल. गैरसमज वाढू देऊ नका. शाब्दिक चकमक टाळण्याचा प्रयत्न करावा. अडथळ्यातून मार्ग काढावा.
 • तूळ:-
  गैरसमजूतीतून वाद वाढू देऊ नका. मानसिक स्वास्थ्य जपावं. डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. खर्च वाढू शकतो. जून्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात.
 • वृश्र्चिक:-
  घरातील कामांना वेगळा वेळ काढाल. दस्तऐवज तपासून घ्यावेत. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दानधर्म केला जाईल. घरी मोठ्या लोकांची उठबस राहिल.
 • धनू:-
  जोडीदाराची प्रगती होईल. नवीन मित्र भेटतील. तुमच्या मताशी सहमती दर्शवली जाईल. प्रवास मजेत होईल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे.
 • मकर:-
  कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक सुबत्ता लाभेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. बढतीची चिन्हे दिसतील. विवाह जुळून येतील.
 • कुंभ:-
  इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. दिवस मजेत व्यतीत कराल. कामाचे प्रशस्ती पत्रक मिळेल. काही अपवादांकडे दुर्लक्ष करावे. दर्जेदार काम करण्यावर भर द्यावा.
 • मीन:-
  औद्योगिक बदल समजून घ्यावेत. मानापमान फार मनावर घेऊ नयेत. जमिनीच्या कामातून फायदा संभवतो. मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. चुकीचे अर्थ काढत बसू नका.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 10 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०९ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०८ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०७ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X