26 February 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ११ एप्रिल २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष
ॐ समर्थाय नमः. व्यावसायीक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग आहेत.

आजचा रंग – करडा पांढरा

वृषभ

ॐ महेशाय नमः. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करता येतील.  कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणुक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल.

आजचा रंग – पिवळा

मिथुन
ॐ गिरिधराय नमः. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल.  व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान.

आजचा रंग – केशरी

कर्क

ॐ मधुसूदनाय नमः. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे.  प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.

आजचा रंग – पोपटी

सिंह

ॐ जयवंताय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. नवीन योजनांचा पाठपुरावा करु शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.

आजचा रंग – हिरवा

कन्या

ॐ अंजनीसूताय नमः. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकार वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.

आजचा रंग – जांभळा

तुळ
ॐ त्रिविक्रमाय नमः. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नविन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान.

आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

ॐ वैकुंठाधिपतयै नमः. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.

आजचा रंग – तपकिरी

धनु

ॐ गणाधिशाय नमः. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबीक सौख्य लाभेल. कौटुंबीक कलह कमी होतील. सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल.

आजचा रंग – पांढरा

मकर

ॐ हरिरुपाय नमः. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायीकांनी सावधपणे गुंतवणुक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी. वाहने जपून चालवावी.

आजचा रंग – आकाशी

कुंभ
ॐ गजाननाय नमः.  मोठ्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. महत्त्वकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.

आजचा रंग – राखाडी

मीन
ॐ व्यंकटेशाय नमः.कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल.  कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान. बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांना आजचे ग्रहमान अनुकूल.

आजचा रंग – पांढरा

 

–डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 11april 2019
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, १० एप्रिल २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०९ एप्रिल २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०८ एप्रिल २०१९
Just Now!
X