News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १२ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  काही इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ द्यावा. अपयशाला घाबरून जाऊ नका. प्रकृतीची काळजी घ्यावी. भावंडांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. अतिविचार करत बसू नका.
 • वृषभः-
  सर्वांशी गोड बोलाल. भावंडांची चांगली मदत होईल. व्यवसायात चांगला आर्थिक नफा होईल. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीत समाधानी असाल.
 • मिथुन:-
  ऐनवेळी येणार्‍या समस्या सोडवाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. प्रेमात गैरसमज आड येऊ शकतात. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे.
 • कर्क:-
  कौटुंबिक गैरसमज दूर करावा. स्थावरचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. घरात काही बदल करावेत. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
 • सिंह:-
  संभाषणाची आवड पूर्ण कराल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. जुने मित्र मंडळ गोळा कराल. घरात तुमच्या मताला पुष्टी मिळेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
 • कन्या:-
  गायन कलेला प्रसिध्दी मिळेल. चिंतन-मनन कराल. जवळचा प्रवास व्यवस्थीत होईल. योग्य तर्क काढू शकाल. चौकसपणे विचार कराल.
 • तुळ:-
  सर्वांशी लाघवीपणे बोलाल. कमिशनमधून फायदा काढाल. सरकारी कामात दिवस जाईल. वाढता खर्च आटोक्यात ठेवावा. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल.
 • वृश्र्चिक:-
  कामात तत्परता दाखवाल. हजरजबाबीपणा​ दाखवून द्याल. चांगले यांत्रिक ज्ञान मिळवाल. उत्तम विचार मांडाल. पटकन टीका करू नका.
 • धनु:-
  खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊ नये. फसवणुकीपासून सावध राहा. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. जामिनकीच्या व्यवहारात अडकू नका. झोपेची तक्रार जाणवेल.
 • मकर:-
  अभ्यासू लोकांशी मैत्री करावी. लहान मुलांच्या सहवासात रमाल. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. व्यापारात चांगला आर्थिक लाभ होईल. व्यवसाय वाढीचा विचार करता येईल.
 • कुंभ:-
  व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. स्वतः च्या फायद्याचा विचार कराल. कारकून मंडळींना प्रगती करता येईल. व्यवसायात नवीन अधिकार हाती घ्याल. योग्य कल्पकता वापराल.
 • मीन:-
  तुमच्या वक्तृत्वाने लोक खुष होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचायला मिळेल. तरल बुद्धिमत्ता वापराल. बौद्धिक छंद जोपासाल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 12 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०९ डिसेंबर २०१९
Just Now!
X