• मेष:-
    आळसाने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात स्त्रियांची मदत होईल. चांगले व्यावसायिक लाभ संभवतात. सुखासक्तपणा जाणवेल.
  • वृषभ:-
    कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. कामाच्या ठिकाणी दर्जा सुधाराल. व्यापारी लोकांना चांगला फायदा संभवतो. नवीन कल्पना मनात रुळतील. आळस दूर सारावा.
  • मिथुन:-
    आध्यात्मिक गोष्टींची आवड जोपासाल. उपासनेत प्रगती करता येईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जवळचा प्रवास कराल. हिंमतीने कामे करता येतील.
  • कर्क:-
    उधळेपणा करू नये. मागचापुढचा विचार करून निर्णय घ्याल. अनपेक्षितपणे जबाबदारी येवून पडेल. स्नायू धरणे यांसारखे विकार त्रासदायक ठरू शकतात. कामातील दिरंगाई दूर करावी.
  • सिंह:-
    कामाची दगदग वाढू शकते. मानापमानाचे प्रसंग नजरेआड करावेत. अंगात उत्साह येईल. कामाच्या ठिकाणी प्रतिकूलता जाणवू शकते. अंगीकृत कार्यातील अडचणी दूर कराव्यात.
  • कन्या:-
    खर्च वाढू शकतात. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. पायाचे त्रास होवू शकतात. आर्थिक बाबींवर सतर्कता बाळगावी.
  • तूळ:-
    पैसे मिळविण्याची प्रबळ इच्छा मनात धरून ठेवाल. काही गोष्टी गुप्तपणे कराल. डोळ्यांची तपासणी योग्यवेळी करून घ्यावी. मनातील संशय दूर करावा. चुकीच्या कल्पनांना मनात घर करून देवू नका.
  • वृश्चिक:-
    घरगुती वातावरणात रमून जाल. ज्येष्ठ मंडळींचा सहवास मिळेल. प्रेमळपणे सर्वांना आपलेसे कराल. घरगुती कामाचा ताण जाणवेल. गृह्सौख्याचा सर्वाधिक विचार कराल.
  • धनु:-
    जवळचा प्रवास कराल. भावंडाना मदत कराल. स्वभावातील लहरीपणा दूर सारावा लागेल. एकलकोंडेपणा बाजूला सारून नवीन मित्र जोडावेत. काहीसा विसरभोळेपणा जाणवू शकतो.
  • मकर:-
    आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात जोडीदाराची उत्तम मदत मिळेल. मनाजोगी खरेदी कराल. शांतपणे आपले मत मांडाल.
  • कुंभ:-
    इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. पोटाची काळजी घ्यावी. वातजन्य पदार्थ खाण्याचे टाळावे. घाईघाईने कामे करणे चुकीचे ठरेल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे.
  • मीन:-
    मानसिक स्थैर्य जपावे. एकांगी विचार करू नका. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. भावनेच्या आहारी जावू नये.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर