10 April 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    कामाचा आनंद घ्यावा. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. स्वभावात चंचलता येईल. लहानांशी मैत्री कराल.
  2. वृषभ:-
    पचनाच्या तक्रारी राहतील. विचारातून कर्मठपणा दर्शवाल. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. जुन्या गोष्टीत अडकून पडाल.
  3. मिथुन:-
    प्रकृतीबाबत हयगय करू नका. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. कामाचे योग्य नियोजन करावे. घरातील कामात अधिक गुंतून राहाल.
  4. कर्क:-
    जवळच्या प्रवासाची मजा घ्याल. जवळचे मित्र जमवाल. आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा. शांतपणे विचार करावा. आधुनिकतेने विचार करून पहावा.
  5. सिंह:-
    गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. काही गोष्टी दिरंगाईने पार पडतील. पायाचे त्रास दुर्लक्षित करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. मानसिक शांतता जपावी लागेल.
  6. कन्या:-
    आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करावा. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा. दिवस आनंदात घालवाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.
  7. तूळ:-
    घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. कष्टाला मागेपुढे पाहू नका. चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा. योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. फार विचार करू नयेत.
  8. वृश्चिक:-
    काही गोष्टींचे चिंतन करावे. धैर्याने कामे हाती घ्यावीत. तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल. चटकन निराश होऊ नका. काही गोष्टींचा सखोल विचार करावा.
  9. धनु:-
    स्थावरची कामे मार्गी लागतील. चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. कंजूषपणा दाखवू नका. अगदी मोजकेच बोलाल.
  10. मकर:-
    प्रौढपणे वागणे ठेवाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडथळ्यातून मार्ग निघेल. सर्वांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमचा मान वाढेल.
  11. कुंभ:-
    मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही मापदंड ठरवून घ्यावेत. आलेल्या संधीचा लाभ उठवावा. गप्पा मारण्यात रंगून जाल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.
  12. मीन:-
    सामाजिक कामात हिरीरीने सहभाग नोंदवाल. मानाने कामे हाती घ्याल. काहीसे स्व‍च्छंदीपणे वागाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. जोडीदाराचा प्रेमळपणा दिसून येईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 13 february 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, १२ फेब्रुवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, १० फेब्रुवारी २०२०
Just Now!
X