• मेष:-
    सांपत्तिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सर्वांचे उत्तम आगत-स्वागत कराल. मनाजोगी खरेदी कराल. गोड पदार्थांवर ताव माराल.
  • वृषभ:-
    प्रराक्रमाला चांगली संधी मिळेल. स्वकष्टावर भर द्याल. नवीन उलाढाली कराल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. महत्वकांक्षा वाढीस लागेल.
  • मिथुन:-
    चोरांपासून सावध राहावे. जमीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. सामाजिक कामात मदत कराल. प्रवासात सावधगिरी बाळगावी. मानसिक शांतता जपावी.
  • कर्क:-
    उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्र-मंडळींचा गोतावळा जमवाल. आर्थिक चिंता मिटेल. गृहशांती जपावी.
  • सिंह:-
    व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. कामात धरसोडपणा करू नका. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्या. संयम ढळू देऊ नका. मानापमान बाजूला सारावा.
  • कन्या:-
    आर्थिक कोंडी मिटेल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. अडचण दूर होईल. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.
  • तूळ:-
    वडिलांची नाराजी दूर करावी. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. काही कामे संथगतीने होतील. लाॅटरीमधून धन लाभ संभवतो. गायन कलेचे कौतुक केले जाईल.
  • वृश्र्चिक:-
    जोडीदाराचा सुशिक्षितपणा दिसून येईल. वैवाहिक सौख्याचा आनंद वाढेल. भागीदारीत फायदा संभवतो. धार्मिक गोष्टींची आवड जोपासाल. तुमचा संपर्क वाढला जाईल.
  • धनू:-
    वैवाहिक सौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. कामातून विरंगुळा शोधाल. दिवस समाधानात जाईल.
  • मकर:-
    ओळखीतून जिव्हाळा वाढेल. छानछोकीची आवड जोपासाल. नाटक, सिनेमा बघायला जाल. प्रेम संबंध सुधारतील. मैत्री अधिक घट्ट होईल.
  • कुंभ:-
    घरातील कामांना वेगळा वेळ काढाल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. बागकामाची आवड पूर्ण कराल. नातेवाईकांनी घर भरुन जाईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.
  • मीन:-
    वाचनाची आवड पूर्ण होईल. लहान प्रवास होईल. हातून सत्कार्य घडेल. कल्पनाशक्ती​ला चांगला वाव मिळेल. बौध्दिक क्षमतेचा वापर करता येईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर