मेष
दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
आज दत्त मंदिरात पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

मिथुन
ॐ द्रां द्रीं दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिकदृष्टिने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – तपकिरी

कर्क
ॐ द्रां द्रीं दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – निळा

सिंह
ॐ शांभवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिकदृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – मोरपंखी

कन्या
ॐ श्रीं आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – जांभळा

तुळ
दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी, ॐ श्रीं आदि गुरवे नमः या मंत्राचा २१ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – मोरपंखी

वृश्चिक
ॐ श्रीं दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – गुलाबी

धनु
गणपती पुजन अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक  ग्रहमान आहे. कौटुंबिक  सौख्य लाभेल. पति, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक  घटनांचा दिवस आहे.गणपती पुजन अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक  ग्रहमान आहे. कौटुंबिक  सौख्य लाभेल. पति, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक  घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – हिरवा

मकर
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – पोपटी

कुंभ
लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- जांभळा

मीन
ॐ द्रां दत्तात्राय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu