• मेष:-
    सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वारंवार मानसिक बदल होतील. कष्टाचे चीज होईल. कौतुकास पात्र व्हाल.
  • वृषभ:-
    नातेवाईकांशी होणारे मतभेद टाळावेत. काही कामात निरुत्साह जाणवेल. घरात शांतता राखावी. धार्मिक कामात सहभाग घ्याल. सामाजिक सेवेची जाणीव ठेवाल.
  • मिथुन:-
    घरगुती खर्च आटोक्यात ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. जबाबदारी यथाशक्ती पार पाडाल. मनाजोगी खरेदी करता येईल. चौकसपणे विचार कराल.
  • कर्क:-
    पैसा खर्च करतांना मागचापुढचा विचार करावा. जबाबदारीची जाणीव ठेवा. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. हुरळून जावू नका.
  • सिंह:-
    दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. अडथळे यशस्वीपणे पार कराल. खर्च करतांना विचार करावा. कामात उत्साह जाणवेल. स्वतंत्र विचार मांडाल.
  • कन्या:-
    सामुदाईक वादापासून दूर राहावे. त्वचेचे विकार संभवतात. काही गोष्टीत अडकून पडाल. रेस, जुगार यांतून फायदा संभवतो. कलेचा आस्वाद घ्याल.
  • तुळ:-
    सतत खटपट करत राहाल. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. व्यावसायिक यशाकडे पाऊल टाकाल. आर्थिक मान सुधारता येईल.
  • वृश्चिक:-
    काही अनपेक्षित बदल संभवतात. अविचाराने निर्णय घेवू नयेत. इर्षेने कामे कराल. वरिष्ठांच्या शब्दाचा योग्य मान ठेवावा. वादात अडकू नका.
  • धनु:-
    स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तडकाफडकी निर्णय घ्यावू नयेत. शक्तीची उपासना करावी. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहावे.
  • मकर:-
    भागीदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यवहार कुशलता ठेवाल. दिवस मनासारखा व्यतीत करता येईल. भागीदारीत पुढचे पाऊल टाकाल. प्रेमसौख्यात अहंकाराला थारा देवू नका.
  • कुंभ:-
    इतरांचा विश्वास संपादन करावा. भांडणातून वितुष्ट निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. मतवैचित्र्य दर्शवू नका. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. त्वचेचे विकार संभवतात.
  • मीन:-
    अध्यात्माकडे ओढ वाढेल. परोपकाराचे महत्व जाणाल. उष्णतेचे विकार जाणवतील. गोड बोलून कामे साध्य कराल. समाजसेवेत संतुष्ट असाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर