1. मेष:-
    शक्यतो कोणत्याही दडपणात राहू नका. शेजारी, भावंडे यांच्याशी सबुरीने वागावे. तुमच्या मित्रपरिवारात वाढ होईल. बेसावधपणे कोणतेही काम करू नका. महिलांच्या शब्दाला मान मिळेल.
  2. वृषभ:-
    जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो कामातील चुका टाळाव्यात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद टाळा. अनुभवाची शिदोरी गोळा करता येईल.
  3. मिथुन:-
    वैवाहिक जीवनातील कुरबुरी टाळाव्यात. अल्लडपणा करून चालणार नाही. एकाचवेळी अनेक कामात लक्ष घालू नका. वडीलधार्‍यांचा शब्द प्रमाण मानवा लागेल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
  4. कर्क:-
    प्रवासादरम्यान सावधानता बाळगावी. मुलांविषयी चिंता लागून राहील. परिस्थिती धोरणीपणाने हाताळाल. उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
  5. सिंह:-
    वरिष्ठ आपल्या कामावर खुष असतील. स्थावर संबंधीच्या कामात यश येईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही गोष्टी मनाविरूद्ध घडू शकतात. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
  6. कन्या:-
    नियमांचे काटेकोर पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. कामगारांविषयीचे प्रश्न सामोपचाराने हाताळावेत. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल.
  7. तूळ:-
    कामाचे योग्य व्यवस्थापन करावे. पत्रव्यवहारात अडचणी येवू शकतात. तुमच्यातील बिनधास्तपणा सकारात्मकतेने वापरावा. मित्रमंडळींचे सहाय्य लाभेल. घरातील कुरबुरी दूर कराव्यात.
  8. वृश्चिक:-
    कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. मालमत्तेसंबंधीचे वाद वाढू शकतात. विद्यार्थ्यानी चिकाटी सोडू नये. ध्यानधारणा, ओंकार यांची मदत घ्यावी. आर्थिक परिस्थितीवर मात करता येईल.
  9. धनू:-
    भागीदारीतील ताणतणाव दूर करावेत. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. उधारीची कामे सावधगिरीने करावीत. तीर्थाटनाचा योग येईल. कामानिमित्त प्रवास कराल.
  10. मकर:-
    घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. काही कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी राहील. प्रवासात समानाची काळजी घ्यावी.
  11. कुंभ:-
    मुलांच्या तब्बेतीची कुरबुर राहील. या ना त्या कारणाने खर्च होईल. बदलीची चिन्हे दिसतील. स्थावर दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. प्राणायाम, ध्यानधारणेने मनाला काबूत ठेवा.
  12. मीन:-
    प्रलोभनापासून दूर राहावे. अध्यापन क्षेत्रात प्रगती साधता येईल. चोरांपासून सावध राहावे. प्रवासात वाहनांवरील वेग मर्यादित ठेवावा. अति धाडस करू नका.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर