मेष

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यावसायिक वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दत्त मंदिरामध्ये साखर, फुटाणे, गूळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवणे.
आजचा रंग – पिवळा

वृषभ

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीमध्ये दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंवचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. ओम राहवे नमः आणि श्री गुरुदेव दत्त हे जप करावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. मुलांशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. दत्त मंदिरामध्ये आज तांदूळ अर्पण करणे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. संमिश्र लाभाचा दिवस. वादविवाद टाळावेत. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. ओम द्रां दत्तात्रयाय नमः या मंत्राची एकमाळ जप करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग- निळा

सिंह

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास मिटवण्याकडे कल ठेवावा वरिष्ठांशी सलोखा राहील. ओम श्री आदि गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – पिवळा

कन्या

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, व्यावसायिक, विचारवंतांना उत्तम दिवस. धनस्थिती उत्तम राहील. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे दान करणे.
आजचा रंग – नारंगी

तुळ

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. संमिश्र लाभाचा दिवस. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. ओम नमः शिवाय आणि गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. वादविवाद टाळावेत. सर्व प्रकारच्या लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचा योग आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम.
आजचा रंग – आकाशी

मकर

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. व्यवसाय नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. गुरू चिंतनामध्ये आजचा दिवस घालवावा.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यवसायामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळनंतर वेळ आनंदात जाईल. ओम नमो नारायण या मंत्राचे नामस्मरण करावे.
आजचा रंग – पांढरा

मीन

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu