12 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरूवार, १६ जुलै २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. परक्या व्यक्तींपासून दूर राहावे. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल. सरकारी कर्मचार्‍यानी दुविधा टाळावी. जवळचे मित्र भेटतील.

वृषभ:-आवश्यकता असेल तरच बोलावे. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. दिवस मजेत जाईल. गोडीगुलाबीने कार्य साधाल.

मिथुन:-कामाच्या स्वरुपाचे नवीन मार्ग शोधावेत. क्षणिक मोहात पडाल. स्वत:वर खर्च कराल. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल. मनात नसती शंका आणू नका.

कर्क:-आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. व्यवसायातून चांगली कमाई होईल. पुढील गरजांसाठी आत्ताच खर्च कराल.

सिंह:-व्यावसायिक कामातून चांगला लाभ मिळवाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. दिवस आनंदात जाईल. नवीन विचार जोपासले जातील.

कन्या:-धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा. त्यातून तुमची सकारात्मकता वाढेल. पत्नीशी वाद वाढवू नका.

तूळ:-अचानक धनलाभाची शक्यता. कमी श्रमातून कामे साध्य करता येतील. रेस, जुगार यातून कमाई कराल. जुनी देणी भागवता येतील. योग्य गुंतवणूक करू शकाल.

वृश्चिक:-व्यावसायिक अनुकूलता लाभेल. मित्रांच्या ओळखीतून लाभ होईल. प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.

धनू:-मानसिक शांतता लाभेल. त्यातून नवीन विचारांना चालना देता येईल. तुमच्यातील कल्पकतेला वाव देण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोकांकडून कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील.

मकर:-अधिक चपळाईने कामे करता येतील. कलेचा मनमुराद आस्वाद घ्याल. उगाचच येणारा आळस टाळावा लागेल. ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा.

कुंभ:-घरात टापटीप ठेवाल. घरातील काही कामे स्वत:हून अंगावर घ्याल. दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल. नवीन ओळखी करून घ्याव्यात. भडक शब्द वापरणे टाळा.

मीन:-केलेल्या निश्चयानुसार वागावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. जुने मित्र गोळा कराल. कामासाठी काही वेगळे पर्याय शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 12:38 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 16th july 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, १५ जुलै २०२०
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ जुलै २०२०
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, १३ जुलै २०२०
Just Now!
X