मेष

ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडीत व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांसाठी उत्तम दिवस आहे. धन स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

वृषभ

ॐ आदि गुरूवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग – निळा

मिथुन

ॐ राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –करडा

कर्क

दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग –नारंगी

सिंह

श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदार्‍या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग -जांभळा

कन्या

श्री दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडीत नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतीत. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल.
आजचा रंग –हिरवा

तुळ

दत्त मंदिरामध्ये निशिगंधाची फुले अर्पण करावी. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

दत्त मंदिरामध्ये पांढर्‍या पदार्थांचे अन्नदान करावे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांशी निगडीत एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –गुलाबी

धनु

श्री भानवे नमः या मंत्राचा जप करावा. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –लाल

मकर

श्री अंतिद्रेयाय नमः या मंत्राचा जप करावा. मुलांशी निगडीत किंवा घरांतील धाकट्या भावंडांशी निगडीत चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –निळा

कुंभ

श्री राहवे नमः या मंत्राचा जप करावा. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरूवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते.
आजचा रंग- ऑफ व्हाईट

मीन

दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. भावंडांशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu