21 January 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ एप्रिल २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत.

वृषभ:-धार्मिक गोष्टींत मन रमवा. वरिष्ठांना नाराज करू नका. लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी दृष्टिकोनाने वागाल. अभ्यासूपणे नवीन गोष्टींत रस घ्याल.

मिथुन:-काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील घरात मोठ्या लोकांची ऊठबस राहील. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.

कर्क:-मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. इतरांना तुमच्या भेटीने आनंद वाटेल. उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्त्रियांच्या मदतीचा लाभ होईल.

सिंह:-व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील. सहकार्‍यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळा. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

कन्या:-मैदानी खेळ खेळाल. शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागाला आवर घाला.

तूळ:-अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल. भागीदारीत नवीन धोरण अजमावाल. घरगुती कामात वेळ जाईल. अती घाई उपयोगाची नाही.

वृश्चिक:-स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल. एकमेकांना समजून घ्यावे. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

धनू:-हाताखालील लोकांकडून कामे करून घेता येतील. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद वाढवू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.

मकर:-काहीसे हेकेखोरपणे वागाल. सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. उगाच चीड-चीड करू नका. संयमी धोरण ठेवावे.

कुंभ:-कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. अधिकाराने कामे हातावेगळी कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल. नवीन मित्र जोडावेत.

मीन:-नातलगांशी सलोखा वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची आवड-निवड दर्शवाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 17th april 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १६ एप्रिल २०२०
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १५ एप्रिल २०२०
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ एप्रिल २०२०
Just Now!
X