30 October 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १९ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  उत्साहाच्या भरात चुकीचा निर्णय घेवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्या मनाजोगा व्यतीत कराल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा.
 • वृषभ:-
  मानसिक चंचलता जाणवेल. कलेला अधिक प्राधान्य द्याल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अकारण वाटणारी भीती दूर करा. विसर-भोळेपणाचा त्रास जाणवू शकतो.
 • मिथुन:-
  घरातील गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. मनातील इच्छा पूर्ण होतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. संभाषणाची आवड जोपासाल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमेल.
 • कर्क:-
  चौकसपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. चुकीचा तर्क करू नका. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांची मदत घ्यावी. लहान व्यवसायिकांना फायदा संभवतो.
 • सिंह:-
  न डगमगता मत मांडा. आर्थिक स्थैर्याचा दुसरा मार्ग शोधावा. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. हसत खेळत कामे कराल. मिळणाऱ्या कमिशनकडे लक्ष द्यावे.
 • कन्या:-
  अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल. तुमचा अंदाज योग्य ठरेल. धूर्तपणे वागाल. आपले विचार योग्य रीतीने मांडाल. कोणतीही गोष्ट लवकर समजून घ्याल.
 • तूळ:-
  खोटे बोलणे टाळावे. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. प्रवासाची आवड जोपासाल. बनवा-बनवी करू नका. सामाजिक बांधिलकी ठेवावी.
 • वृश्चिक:-
  ओळखीचा फायदा होईल. गप्पांमधून आपले काम साध्य कराल. अधिकारी व्यक्तींचे मत विचारात घ्यावे. तरुणांशी मैत्री कराल. कामात स्त्री वर्गाचे सहाय्य घ्याल.
 • धनु:-
  तुमच्यातील हर-हुन्नरीपणा दाखवून द्यावा. व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल. पत्रकारांना काही अधिकार हातात येतील. व्यवसायात उत्कृष्ट नफा होईल.
 • मकर:-
  चांगले साहित्य वाचाल. कामाचे सखोल ज्ञान मिळवाल. मधुर वाणीने सर्वाना प्रभावित कराल. शिस्तीचा बडगा करू नका. प्रवासाची आवड जोपासाल.
 • कुंभ:-
  भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मनात नसतांना सुद्धा प्रवास करावा लागेल. कामात आळस करू नका. पत्नीच्या विचाराला प्राधान्य द्यावे. चिकाटी सोडून चालणार नाही.
 • मीन:-
  जोडीदाराची व्यवहार कुशलता लक्षात येईल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्यावर जोडीदाराच्या मताचा प्रभाव राहील. काही कामे दिरंगाईने होतील.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 19 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, १८ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १७ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, १६ सप्टेंबर २०१९
Just Now!
X