मेष

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. कामांसाठी नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी उत्तम दिवस. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – निळा

वृषभ

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. आर्थिक निर्णयासाठी चांगला दिवस. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. गुरू मंत्राचा जप सुरू ठेवावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. आज भावंड्याच्या गाठीभेटीचा योग आहे. प्रवासाचे योग आहेत. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. ओम मिऋतवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

कर्क

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. आज कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आनंदी दिवस जाईल. ओम आदि गुरवे नमः जप करावा.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस. उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संतती सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. ओम द्रां दत्तात्रयाय नमः जप करणे.
आजचा रंग – निळा

कन्या

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. ओम द्रां दत्तात्रयाय नमः जप करणे.
आजचा रंग – पिवळा

तुळ

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास जपून करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाली जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. ओम श्री आदि गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – क्रीम

धनु

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत. कामाचा तणाव जाणवेल. आर्थिक आवक चांगली असेल. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. ओम गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – आकाशी

मकर

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. अधिकारी व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करणे.
आजचा रंग – गडद तपकिरी

मीन

संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यवहार जपून करावे. प्रकृतीची काळजी घेणे. वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu