मेष
ओम द्रां दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ
लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क
गणपती पूजन अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – पोपटी

सिंह
ओम श्रीं दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – हिरवा

कन्या
दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. ओम श्रीं आदि गुरवे नम: या मंत्राचा २१ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – जांभळा

तुळ
ओम श्रीं आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीमध्ये असेल. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक
ओम शांभवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासांशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – तपकिरी

धनु
ओम द्रां द्रीं दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम द्रां द्रीं दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. धाडसी योजना रावबू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – आकाशी

कुंभ
आज पांढऱ्या वस्तूंचे दान दत्त मंदिरात करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग- राखाडी

मीन
दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत असेल. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu