मेष

ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

वृषभ

ॐ आदि गुरूवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. कमोडिटी मार्केट, शेअर्सशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. पाणी, शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –निळा

मिथुन

ॐ राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरीमधील बदल, पगार वाढ यांसारखे प्रश्न मार्गस्थ होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. वाहन सौख्य लाभेल.
आजचा रंग – करडा

कर्क

दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. वरिष्ठांची मर्जी राहील. राजकारण, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत व्यक्तिंसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. नवीन योजना राबविता येतील.
आजचा रंग –नारंगी

सिंह

श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. नवीन कामांची सुरूवात करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यावसायिकांसाठी ग्रहांची अनुकूलता आहे. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -जांभळा

कन्या

श्री दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. मोठे आर्थिक निर्णय घेत असताना चर्चा करावी. जमीन, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –हिरवा

तुळ

दत्त मंदिरामध्ये निशिगंधाची फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक कलह कमी होतील. स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग -तपकिरी

वृश्चिक

दत्त मंदिरामध्ये पांढऱ्या पदार्थाचे अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. कुणालाही गृहित धरून कामाचे नियोजन करू नये. प्रवास जपून करावेत. आर्थिक गुंतवणूक करीत असताना सावध रहावे. मोठे आर्थिक धाडस करू नये.
आजचा रंग –गुलाबी

धनु

श्री भानवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. महत्त्वकांक्षी योजनांचे नियोजन करावे. अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. संतती विषयक अडीअडचणी सोडवू शकाल.
आजचा रंग – लाल

मकर

ॐ अंतिद्रेयाय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. बांधकाम व्यावसायिकांसाठी लाभाचा दिवस. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. वरिष्ठांची मर्जी राहील.
आजचा रंग –निळा

कुंभ

ॐ राहवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात. मोठया जबाबदारीला सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिक स्पर्धेला खंबीरपणे तोंड देऊ शकाल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

मीन

दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजनांचा लाभ होईल. जुनी येणी वसूल करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. व्यवसाय, नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांची मर्जी राहील.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu