23 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २३ जानेवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    स्थावरची कामे मार्गी लागतील. हातून एखादे सत्कार्य घडेल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. चांगली मन:शांती लाभेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.
  2. वृषभ:-
    प्रवासात सर्वतोपरी काळजी घ्यावी. काहीशी कौटुंबिक चिंता सतावेल. काटकसरीने वागावे लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतभिन्नता दर्शवू नका.
  3. मिथुन:-
    मुलांकडून आनंद वार्ता मिळतील जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. बाहेरील अन्नपदार्थ टाळा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
  4. कर्क:-
    नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. मनातील अकारण भीती बाजूला सारावी. नामस्मरणाचा लाभ घ्यावा. कौटुंबिक खर्च वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
  5. सिंह:-
    वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. हातातील कामे तडीस जातील. कुटुंबात मंगल कार्य होईल. ओळखीचा फायदा घ्यावा.
  6. कन्या:-
    अतिअपेक्षा बाळगू नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे. समाधान बाळगणे गरजेचे आहे. मानसिक शांतता जपावी. जोडीदाराची बाजू लक्षात घ्या.
  7. तुळ:-
    प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. नातेवाईकांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक चिंता लवकरच मिटेल. हातातील कामांत कसूर करू नका. अनाठायी खर्च टाळावा.
  8. वृश्चिक:-
    हातात नवीन अधिकार येतील. भान राखून वागावे. वरिष्ठांची मर्जी राहील. धाडसाने कामे हाती घ्यावी. कामे अधिक उर्जेने कराल.
  9. धनू:-
    कौटुंबिक काळजी करू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा. अतिविचारात वेळ व्यर्थ जाईल. सामुदायिक वादापासून दूर राहावे. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.
  10. मकर:-
    गरज लक्षात घेऊन खर्च करा. मैत्रीत गैरसमज टाळावेत. स्थावरच्या कामांतून फायदा संभवतो. अचानक धन लाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल.
  11. कुंभ:-
    बढतीसाठी प्रयत्न करावेत. कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. झोपेचे तक्रार जाणवेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. फसवणुकीपासून सावध रहा.
  12. मीन:-
    अपवादाकडे लक्ष देऊ नका. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केन्द्रित करा. हितशत्रूंपासून सावध रहा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. कौटुंबिक शांतता जपावी.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on January 23, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 23 january 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ जानेवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २१ जानेवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, २० जानेवारी २०२०
Just Now!
X