05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कमी श्रमात कामे होतील. जुगारातून आर्थिक लाभ संभवतो. मैदानी खेळ खेळाल. बुद्धी-प्राविण्य दाखवाल. योग्य अनुमान काढाल.
 • वृषभ:-
  कौटुंबिक आनंद वाढेल. धार्मिक गोष्टींची आवड दर्शवाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग करता येईल. तारतम्याने वागाल. मित्रांशी गप्पांमध्ये दिवस घालवाल.
 • मिथुन:-
  बौद्धिक छंद जोपासायला वेळ मिळेल. एकलकोंडेपणा दूर होईल. गोड बोलून कामे साध्य कराल. साहित्याची आवड जोपासाल. चौकसपणे विचार करावा.
 • कर्क:-
  सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. आवडीचे पदार्थ करून खायला घालाल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडी निवडीवर ठाम राहाल. कौटुंबिक विचारला प्राधान्य द्याल.
 • सिंह:-
  तुमच्या व्यक्तिमत्त्वाची उत्तम छाप पडेल. दिवस मजेत घालवाल. स्वत:चा वैचारिक कल सुधाराल. आवडत्या गोष्टींसाठी अधिक वेळ द्याल. फार विचार करू नये.
 • कन्या:-
  नातेवाईकांना मदत कराल. देणी चुकवावी लागतील. काही गोष्टी स्वत:साठी राखून ठेवाव्यात. सामाजिक बांधिलकी जपाल. खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल.
 • तूळ:-
  उत्कृष्ट व्यावसायिक लाभ होईल. व्यापाऱ्यांची पत सुधारेल. मनातील इच्छा पूर्ण कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल. नवीन संबंध प्रस्थापित कराल.
 • वृश्चिक:-
  तुमचा मान-सन्मान वाढेल. सामाजिक कार्याला हातभार लावाल. तुमच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले जाईल. शिताफीने कार्यभाग सांभाळाल. मानसिक समाधान लाभेल.
 • धनु:-
  धार्मिक कामात पुढाकार घ्याल. परोपकाराचे महत्व पटवून द्याल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. शैक्षणिक कामे होतील. स्वत:च्या मर्जीने वागाल.
 • मकर:-
  वैचारिक गोंधळ टाळावा. जोडीदाराविषयीचा गैरसमज दूर करावा. अचानक धनलाभाची शक्यता. एकाच बाजूने विचार करू नका. जुन्या गोष्टींत अडकून राहू नका.
 • कुंभ:-
  कार्याची पद्धत बदलून पहावी. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीतील कार्यात पुढाकार घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चार-चौघांत कौतुक केले जाईल.
 • मीन:-
  हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. स्वत:च्या हिमतीने कामे कराल. नातेवाईकांची ये-जा वाढेल. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 24 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, २३ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X