27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  सबुरीचे धोरण ठेवावे. उष्णतेचे त्रास संभवतात. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. तिखट पदार्थ खाण्याची आवड पूर्ण होईल.
 • वृषभ:-
  जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची काळजी घ्यावी. नसते साहस करू नका. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील गैरसमज दूर करावा.
 • मिथुन:-
  एकाच गोष्टीत अडून राहू नये. अनपेक्षित येणाऱ्या समस्या हाताळाल. कौटुंबिक अडचण आधी दूर करावी. जमिनीच्या कामात गुंतून पडाल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल.
 • कर्क:-
  भावनेच्या आहारी जावू नये. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्या. हातात अधिकार येतील. कलेला प्रतिष्ठा मिळेल. छुप्या शत्रूंवर विजय मिळतील.
 • सिंह:-
  मानसिक त्रास जाणवू शकतो. कर्जाची प्रकरणे व्यवस्थित हाताळावीत. चंचलता बाजूला सारून विचार करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आपल्याच मताला प्राधान्य द्याल.
 • कन्या:-
  मैत्रीचे संबंध सुधारतील. कामाला गती येईल. खर्च वाढू शकतो. जबाबदारीची जाणीव ठेवावी. उत्साहाच्या भरात कोणताही शब्द देवू नका.
 • तूळ:-
  गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. महत्त्वाच्या कामांना खीळ बसू शकते. झोपेची तक्रार जाणवू शकते. क्षणिक सुखाच्या मागे धावू नका. कामाची गती वाढवावी.
 • वृश्चिक:-
  धार्मिक कामात आनंदाने सहभाग घ्याल. सेवावृत्तीचे महत्त्व जाणाल. चुकीच्या कल्पनांना मनात थारा देवू नका. गुरुजनांचा आदर करावा. खोट्या स्तुतीपासून सावध राहावे.
 • धनु:-
  अचानक धनलाभाची शक्यता. अंगीभूत कलेचा प्रसार करता येईल. अडकलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. कामात वडिलधाऱ्यांची मदत घ्यावी. सतत प्रयत्न करत राहाल.
 • मकर:-
  जोडीदाराचे म्हणणे मान्य करावे लागेल. एकाच बाजूने विचार करणे चुकीचे ठरेल. वरिष्ठांच्या रागाला सामोरे जाण्याची वेळ येवू शकते. स्वभावातील मानीपणा कमी करावा. प्रवासात काळजी घ्यावी.
 • कुंभ:-
  जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आकस्मिकतेला सामोरे जावे लागेल. पोटाची तक्रार जाणवू शकते. कामाचे समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.
 • मीन:-
  भागादारीत तुमचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला चांगला आर्थिक लाभ संभवतो. मैत्री अधिक बहरेल. गप्पांमधून जवळीक साधाल. कोणत्याही गोष्टीचे चुकीचे अर्थ काढू नका.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 26 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, २५ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, २३ सप्टेंबर २०१९
Just Now!
X