मेष:-कौटुंबिक सौख्यात रमाल. गरज नसतांना प्रवास करावा लागू शकतो. लहान मुलांच्यात रमून जाल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. आवडीचे पदार्थ चाखाल.

वृषभ:-ऐक्याची भावना जोपासाल. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. थोरांशी सल्ला-मसलत कराल. कामात चंचलता येईल. तोंडात साखर ठेवून बोलाल.

मिथुन:-मोकळेपणाने बोलणे टाळाल. पत्नीचा प्रेमळ सहवास मिळेल. झोपेची तक्रार दूर होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. मानसिक संभ्रम दूर करावा.

कर्क:-उगाचच चंचलता वाढेल. फार विचार करत बसू नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्याल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जुने विचार मनातून काढून टाकावेत.

सिंह:-कलेसाठी अधिक वेळ काढाल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामात स्थिरता ठेवावी. गप्पांमध्ये वेळ घालवाल. पोटाची काळजी घ्यावी.

कन्या:-कामात जोडीदाराचा हातभार लागेल. प्रगतीची नवीन संधी उपलब्ध होईल. मुलांना नवीन गोष्टी शिकवाल. व्यायामाचे महत्व लक्षात घ्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल.

तूळ:-काही कामे कमी श्रमात पार पडतील. घरातील वातावरण अस्वस्थ वाटू शकते. नवीन गोष्टी आमलात आणताना विचार करावा. अचानक धनलाभ संभवतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

वृश्चिक:-गरज नसेल तर प्रवास टाळावा. जोडीदाराचे सौख्य वाढेल. नवीन गोष्टींकडे कल वाढेल. मोहाळा बळी पडू नका. जवळचे मित्र भेटतील.

धनू:-कौटुंबिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. कामाचा आनंद घ्याल. लोकोपवादाला बळी पडू नका. जुन्या कामात प्रगती कराल.

मकर:-मानसिक ताण जाणवू शकतो. सतत बडबड कराल. कमिशनचा विचार आधी कराल. आवडते पुस्तक वाचाल. रागावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:-तुमच्या स्मरणशक्तीचे कौतुक केले जाईल. घरातील साफसफाई कराल. काही सकारात्मक बदल कराल. आवडता छंद जोपासाल. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका.

मीन:-उगाचच थकवा जाणवेल. सकारात्मक विचार करावेत. हस्तकलेत मन रमवावे. लबाड लोकांचा संग टाळावा. खोट्याचा आधार घेऊ नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर