News Flash

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ३१ जानेवारी २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

दत्त मंदिरामध्ये साखर, फुटाणे, गूळ, खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको.
आजचा रंग –पिवळा

वृषभ

ॐ राहवे नमः आणि श्री गुरूदेव दत्त या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांशी निगडीत एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

दत्त मंदिरामध्ये आज तांदूळ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ द्रां दत्तात्रय नमः या मंत्राची एक माळ जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. मुलांशी निगडीत किंवा घरांतील धाकट्या भावंडांशी निगडीत चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –निळा

सिंह

ॐ श्री आदि गुरूवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरूवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते.
आजचा रंग -पिवळा

कन्या

दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढर्‍या वस्तूंचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. भावंडांशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग –नारंगी

तुळ

गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडीत व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांसाठी उत्तम दिवस आहे. धन स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

आज ॐ नमः शिवाय आणि गुरू, मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग –पांढरा

धनु

दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –आकाशी

मकर

गुरू चिंतनामध्ये आजचा दिवस घालवावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

ॐ नमो नारायण या मंत्राचे नामस्मरण दिवसभर करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदार्‍या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग- पांढरा

मीन

दत्त महारांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडीत नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतीत. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:28 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 31 january 2019
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ३० जानेवारी २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ जानेवारी २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ जानेवारी २०१९
Just Now!
X