05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कंजूसपणा करू नये. मुलांच्याबाबींमध्ये अधिक लक्ष घालावे. जोडीदाराचा सुस्वभाविपणा दिसून येईल. अनपेक्षित लाभ संभवतो. मानसिक स्थैर्य जपावे.
 • वृषभ:-
  वैवाहिक सौख्य अधिक फुलेल. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. गप्पांमध्ये रमून जाल. भागादारीतील संबंध सुधारतील. तुमचे संपर्क वाढतील.
 • मिथुन:-
  नातेवाईकांना मदत कराल. हाताखालील लोक चांगला प्रतिसाद देतील. कामातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील. अपचनाचा त्रास जाणवेल.
 • कर्क:-
  तुमच्या बुद्धीचातुर्याचे कौतुक केले जाईल. नावलौकिक वाढेल. बौद्धिक खेळात यशस्वी व्हाल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. विचारांना योग्य दिशा द्यावी
 • सिंह:-
  उत्तम गृहसौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. घरातील ज्येष्ठांशी जुळवून घ्यावे. तिखट पदार्थ खाण्याची हौस पुरवाल. आरोग्यात सुधारणा होईल.
 • कन्या:-
  वाचनाची आवड जोपासली जाईल. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल.
 • तूळ:-
  सांपत्तिक स्थिती सुधारेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. आर्थिक गुंतवणूक कराल. आवडीच्या वस्तू खरेदी कराल. बोलण्यातून सर्वांवर चांगली छाप पाडाल.
 • वृश्चिक:-
  स्वभावातील मानीपणा बाजूला सारावा. योग्य तर्क लावावा. स्वत:चा मान राखाल. गोष्टी दिलदारपणे जाणून घ्याल. कामाच्या ठिकाणी मानाची जागा मिळवाल.
 • धनु:-
  काही गोष्टीत मन रमणार नाही. पारमार्थिक उन्नती साधाल. सांपत्तिक अडचण सुटेल. दानाचे महत्त्व जाणाल. सामाजिक सेवेचे महत्त्व जाणाल.
 • मकर:-
  मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. तुमची आर्थिक मनोकामना पूर्ण होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. पैशाच्या बाबतीत काटकसर कराल. ओळखीतून कामे पार पडतील.
 • कुंभ:-
  बौद्धिक क्षेत्रात काम कराल. व्यावसायिक चिंता मिटेल. हातात चांगला अधिकार येईल. कौटुंबिक स्थैर्य लाभेल. घरातून चांगले पाठबळ मिळेल.
 • मीन:-
  ज्ञानाचा सदुपयोग करता येईल. वैचारिक दृष्टीकोन सुधारेल. अध्यात्मिक बाजू बळकट होईल. कर्तृत्वाचे कौतुक केले जाईल. हातून उत्तम लिखाण होईल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 31 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ३० ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X