• मेष:-मनाची दोलायमान अवस्था जाणवेल. तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवे संबंध जोडले जातील.
  • वृषभ:-कौटुंबिक गैरसमज टाळावेत. तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावी लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. उगाच चिडचिड करू नका.
  • मिथुन:-चंचलतेवर मात करा. स्त्रियांच्या सानिध्यात वावराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.
  • कर्क:-मानसिक चांचल्य जाणवेल. उगाच नसत्या काळज्या करत बसू नका. वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका.
  • सिंह:-व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रीत करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनाची विशालता दाखवाल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल.
  • कन्या:-अतिविचार करणे टाळावे. बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल.
  • तूळ:-पत्नीच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय येईल. मुलांशी लहानसहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल. नसते साहस करतांना सारासार विचार करावा.
  • वृश्चिक:-गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. वादावादीत सहभाग नोंदवू नका. मागचापुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी.
  • धनू:-तुमचा कामातील जोम वाढेल. आपले उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी. चटकन रागवू नका.
  • मकर:-शांत व गंभीर विचार मांडाल. कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात.
  • कुंभ:-सतत खटपट करत राहाल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. सांपत्तिक दर्जा टिकवून ठेवावा लागेल.
  • मीन:-कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर