22 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ६ ऑगस्ट २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-विद्यार्थ्यांना चांगला काल. महिला वर्ग खुश राहील. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते. जोडीदाराची कृती खटकू शकते.

वृषभ:-योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. गुंतवणूक लाभदायक ठरेल. योग्य मूल्यमापन करावे. अति अपेक्षा ठेऊ नका.

मिथुन:-मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. आर्थिक बाजू बळकट करावी. एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात.

कर्क:-देणी-घेणी मिटतील. दिवस आळसात जाईल. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी. हट्टीपणा सोडावा लागेल.

सिंह:-छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.

कन्या:-तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. कशाचाही गैरफायदा घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

तूळ:-प्रबळ इच्छेवर कामे होतील. उधार-उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा.

वृश्चिक:-कायदेशीर सल्ला घ्यावा. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या. मुलांचा विचार समजून घ्या. प्रलंबित येणी मिळू शकतील.

धनू:-मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका. परिस्थितीत सुधारणा होईल. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा.

मकर:-प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी. बौद्धिक क्षमता वाढीस लावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळचा प्रवास पुढे ढकलावा.

कुंभ:-जुने वाद उकरून काढू नका. मैत्रीत वादाची शक्यता. पूर्व नियोजित कामे करावीत. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

मीन:-घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका. आततायीपणे कृती करू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday 6th august 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ५ ऑगस्ट २०२०
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ४ ऑगस्ट २०२०
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ३ ऑगस्ट २०२०
Just Now!
X