02 March 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, गुरुवार , ६ एप्रिल २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घरांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. श्री गुरवेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. पुरुषसुक्ताचे पाठ करावेत.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आर्थिक येणी वसुलीसाठी योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करणे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामाचा पाठपुरावा करावा. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. दिवसभर गुरू स्मरण करणे.
आजचा रंग – सोनेरी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या भेटी गाठीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक फायदे होतील. प्रवासाचे योग संभवतात. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – सोनेरी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. दगदगीचा दिवस. परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. श्री गुरुनाथाय नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

धनु

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी कामगारांशी सलोख्याने वागावे. प्रवास जपून करावा. वादविवाद टाळावेत. गुरू चरित्र पारायण करावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायांशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासांचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. प्रगतीचे योग. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – लाल

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावेत. खर्च संभवतो. श्री आदि गुरवेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

मीन

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. कणकधारा स्तोत्र म्हणावे.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi thursday april 6 march 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार , ५ एप्रिल २०१७
2 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ४ एप्रिल २०१७
3 आजचे राशीभविष्य, सोमवार, ३ एप्रिल २०१७
Just Now!
X