• मेष:-
    गप्पा-गोष्टींमधून मैत्रीचे संबंध वाढतील. पित्ताचा त्रास जाणवेल. कामात अधिक प्रयत्न करावा लागेल. आळस बाजूला सारून कामे हाती घ्यावीत. घरगुती कामासाठी प्रवास करावा लागेल.
  • वृषभ:-
    कामात प्रगतीला वाव आहे. मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित कराल. हातातील कामात यश येईल. मौजमजेकडे अधिक लक्ष द्याल.
  • मिथुन:-
    कामाची धावपळ वाढेल. मुलांसोबत मतभेद होतील. घरातील काही अडचणी दूर कराव्यात. जोडीदाराविषयी मनातील ग्रह काढून टाकावा. गप्पांमध्ये रमाल.
  • कर्क:-
    नवीन वाहन घेण्याचा विचार केला जाईल. घरातील वातावरण खेळकर राहील. घर सजवले जाईल. वातविकार संभवतात. एखाद्या तत्त्वज्ञानासारचे वागाल.
  • सिंह:-
    कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. पित्तविकाराचा त्रास जाणवेल. प्रवासात नवीन मित्र जोडाल. तुमचा संपर्क वाढेल.
  • कन्या:-
    रागावर नियंत्रण ठेवावे. कामाचा व्याप वाढू शकतो. तडकाफडकी निर्णय घेवू नका. वेळेचे योग्य नियोजन करावे. खर्च जपून करावा.
  • तूळ:-
    दिवस मजेत घालवाल. गप्पा-गोष्टीत रस घ्याल. व्यवसायिक लाभाने संतुष्ट व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात चिकाटी ठेवावी.
  • वृश्चिक:-
    मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. नवीन उर्जेने कामे कराल. आर्थिक गणिते जुळून येतील. जमिनीची कामे निघतील. घरासाठी मोठी वस्तू खरेदी कराल.
  • धनु:-
    सरकारी कामात दिवस जाईल. कामातील बदलांकडे लक्ष ठेवा. कला इतरांसमोर सादर कराल. दिरंगाईतून मार्ग काढाल. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवा.
  • मकर:-
    कामाची धांदल उडेल. धावपळीत दिवस जाईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वरिष्ठांना खुश करावे. स्वत:चा मान जपावा.
  • कुंभ:-
    आर्थिक लाभ चांगले होतील. धार्मिक यात्रा काढाल. कमिशनमधून फायदा होईल. सहृदयतेने वागणूक ठेवाल. जोडीदाराशी मतभेद टाळावेत.
  • मीन:-
    भागीदारीत सलोखा वाढवावा. जोडीदाराचा वरचष्मा राहील. समोरच्याची बाजू समजून घ्याल. उत्तम धनलाभ संभवतो. परोपकाराची जाणीव ठेवाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर