• मेष:-
    वैवाहिक सौख्यात भर पडेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या काही गोष्टी समजून घ्याव्यात. ज्ञानाचा सदुपयोग होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
  • वृषभ:-
    कामात गतिमानता येईल. व्यावसायिक लाभ उठवाल. तुमचे धैर्य व हिंमत वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक अडकून पडाल. कौटुंबिक खर्चावर लक्ष द्यावे.
  • मिथुन:-
    कर्तबगारीला चांगला वाव आहे. प्रगल्भ विचार दर्शवाल. प्रवासात काळजी घ्यावी. हातातील कलेतून आनंद मिळवाल. आवडते साहित्य वाचाल.
  • कर्क:-
    कौटुंबिक खर्चाचे भान राखाल. आवडीचे पदार्थ खाण्यावर भर द्याल. बोलताना संयम राखावा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
  • सिंह:-
    दूरवरच्या प्रवासाचा योग येईल. नवीन उत्साहाने कामे हाती घ्याल. बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. काही कामे दिरंगाईने पार पडतील.
  • कन्या:-
    व्यावसायिक लाभाने संतुष्ट असाल. प्रत्येक गोष्टीत चोखंदळपणा दाखवाल. सामुदाईक भान राखावे. काटकसरीने वागाल. जुनी कामे समोर येतील.
  • तूळ:-
    मौजमजेत दिवस घालवाल. नवीन कार्यक्षेत्राचा विचार कराल. नवीन मैत्री जपण्याचा प्रयत्न करावा. घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. तुमचा दर्जा सुधारेल.
  • वृश्चिक:-
    किरकोळ अडचणीतून मार्ग काढावा लागेल. मानसिक सौख्य चांगले लाभेल. घरगुती समारंभात भाग घ्याल. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. मोठ्या लोकांचे मार्गदर्शन घ्यावे.
  • धनु:-
    तुमच्या कामाची वाखाणनी केली जाईल. चुकीच्या कामात अडकू नका. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. मदत करण्याचा आनंद मिळेल. योग्यवेळी मदत मिळेल.
  • मकर:-
    कामात पत्नीचे सहकार्य मिळेल. जोडीदारास चांगली आर्थिक प्राप्ती होईल. गैरसमजाला मनात थारा देवू नये. अचानक धनलाभाची शक्यता. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.
  • कुंभ:-
    एकमेकांमधील ओढ वाढीस लागेल. भागीदातून चांगला फायदा संभवतो. मनातील श्रद्धा ढळू देवू नका. ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. जोडीदाराला लाभ होतील.
  • मीन:-
    हाताखालील लोकांकडून कामे करुन घ्यावीत. आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात करणे शक्य होईल. कामातून चांगली प्राप्ती संभवते. कामे वेळेत पार पडतील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर