1. मेष:-
    कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आवडीचे गोड पदार्थ चाखाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सुखाचा आनंद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
  2. वृषभ:-
    तुमचा प्रभाव राहील. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आवाजात गोडवा ठेवाल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. चांगला आर्थिक लाभ होईल.
  3. मिथुन:-
    फार विचार करत राहू नये. ध्यानधारणा करावी. इतरांसमोर आपली कला सादर करता येईल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. वागण्यात धोरणीपणा दाखवाल.
  4. कर्क:-
    मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्या. जोडीदाराचे प्रभुत्व राहील. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. अतिविचार करू नका. कफ-विकराचा त्रास जाणवेल.
  5. सिंह:-
    कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नवीन मित्र जोडले जातील. व्यावहारिक कुशलतेने वागाल. जोडीदाराशी मन-मोकळ्या गप्पा माराल.
  6. कन्या:-
    इतरांचा विश्वास संपादन करावा. वादाला बळी पडू नका. कामाचा जोम वाढेल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. धार्मिक स्थळांना भेट द्याल.
  7. तुळ:-
    कामातील खाचा-खोचा जाणून घ्याव्यात. घाई-घाईने निर्णय घेऊ नका. शेअर्ससारख्या कामांतून धनलाभ संभवतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. तोंडात साखर ठेवावी लागेल.
  8. वृश्चिक:-
    अविचाराला बळी पडू नका. उताविळपणे निर्णय घेतले जातील. कामाच्या ठिकाणी काहीशी प्रतिकूलता जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दृढनिश्चय करावा लागेल.
  9. धनु:-कौटुंबिक चिंता सतावेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे. कामातून समाधान शोधाल. फसवणुकीपासून सावध राहावे.
  10. मकर:-
    मनातील अनामिक भीती काढून टाकावी. काही कामे खिळून राहू शकतात. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगावी लागेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. पैज जिंकता येईल.
  11. कुंभ:-
    घरातील वातावरण आनंददायी असेल. गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकाल. कामातील बदल ध्यानात घ्या. आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करावा. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
  12. मीन:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांना नाराज करू नका. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामाची योग्य पोच-पावती मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर