05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  दिवसभर कामात गुंतून राहाल. घरगुती कामात अधिक रस घ्याल. समाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका. जोडीदाराची धावपळ वाढेल.
 • वृषभ:-
  धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. काही सूचक स्वप्ने पडतील. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे.
 • मिथुन:-
  अचानक धनलाभ संभवतो. मानसिक शांतता जपावी. प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही हयगय करू नये. घरगुती प्रश्न संयमाने सोडवाल. छुप्याशत्रूंचा त्रास जाणवेल.
 • कर्क:-
  वैवाहिक सौख्यात भर पडेल. भागीदारीत समाधानी असाल. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. अधिकारात वाढ होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.
 • सिंह:-
  तिखट व तामसी पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. कौटुंबिक शांतता जपावी. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. काही कामे धाडसाने हाती घ्याल. तुमचा दर्जा सुधारेल.
 • कन्या:-
  भाजणे, कापणे यांसारखे त्रास संभवतात. वादविवादात अडकू नका. रागावर नियंत्रण ठेवावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कौटुंबिक खर्च नियंत्रित ठेवावा.
 • तूळ:-
  कामाचे योग्य नियोजन करावे. गोड वाणीने सर्वांना जिंकून घ्याल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सामुदायिक गोष्टींचे भान राखावे.
 • वृश्चिक:-
  झोपेची तक्रार जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. खर्चाचे भान राखावे. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वक्तृत्वाची आवड पूर्ण कराल.
 • धनु:-
  काही बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे. काही कामे अधिक कस पाहतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. गोड पदार्थ खायला मिळतील.
 • मकर:-
  दिवस मजेत जाईल. उपासनेत अधिक वेळ घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचा आदर करावा.
 • कुंभ:-
  मानसिक व्यग्रता जाणवेल. तुमच्या कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अडचणीतून मार्ग काढाल. मनातील निराशा दूर सारावी.
 • मीन:-
  भागीदारीत सलोखा वाढवावा. कौटुंबिक शांतता जपावी. सुखासक्तपणा जाणवेल. परोपकाराने वागाल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 05 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०४ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, ०३ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०२ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X