• मेष:-
    प्रलोभनांपासून दूर राहावे. फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे. तब्येतीची हयगय करू नये. उपासनेला बळ मिळेल. वैचारिक बाजू बळकट होईल.
  • वृषभ:-
    आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. अचानक धनलाभ संभवतो. मुलांच्या बाबतीत हयगय करू नये. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल.
  • मिथुन:-
    वैवाहिक सौख्यात भर पडेल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. अतिअपेक्षा ठेवू नयेत. उच्च राहणीचा विचार कराल. आधिभौतिक गोष्टींचा विचार कराल.
  • कर्क:-
    जोडीदाराच्या मताचा आदर करावा. अपचनाचा त्रास जाणवेल. सांपत्तीक दर्जा सुधारेल. नातेवाईकांची मदत मिळेल. मनात वाढ होईल.
  • सिंह:-
    तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. कामाची प्रशस्ती मिळेल. कामात सातत्य ठेवावे. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. धार्मिक ग्रंथांची माहिती करून घ्याल.
  • कन्या:-
    घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. उत्तम गृहसौख्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
  • तूळ:-
    आशावादी दृष्टिकोन ठेवाल. चांगले साहित्य वाचनात येईल. अभ्यासूपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. भावंडांची काळजी लागून राहील. पैज जिंकली जाईल.
  • वृश्चिक:-
    व्यापाऱ्यांना चांगला लाभ मिळेल. हातातील कार्यात जोम येईल. जोडीदाराच्या प्रेमळपणात वाढ होईल. कामात उतावीळपणा कराल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
  • धनु:-
    कलेला पोषक वातावरण राहील. हसत-हसत कामे कराल. आपले विचार उत्तम प्रकारे मांडाल. अतिचिकित्सा करू नका. खरेपणाची कास धरावी.
  • मकर:-
    कागदपत्रांची योग्य छाननी करावी. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कोर्ट-काचेरीची कामे होतील. आर्थिक गोष्टी सावधगिरीने कराव्यात. कर्जाची परतफेड केली जातील.
  • कुंभ:-
    मित्रपरिवार वाढेल. नवीन ओळखी होतील. समोर आलेल्या नवीन संधीचा लाभ घ्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. प्रवासाची आवड पूर्ण कराल.
  • मीन:-
    बौद्धिक चातुर्य दाखवण्याची संधी मिळेल. पुढील गोष्टींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. पदोन्नतीच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. व्यावसायिक चिकाटी सोडू नका. घरातील स्त्रीवर्गाची उत्तम साथ लाभेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर