News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  आपली काहीशी चिडचिड होऊ शकते. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. भागीदारीत वाद आडवे आणू नयेत. भावंडांची चिंता लागून राहील. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल.
 • वृषभ:-
  हातातील कामात अपेक्षित यश मिळेल. मन एकाग्र करण्याचाप्रयत्न करावा. जुन्या कामातून धनलाभ संभवतो. नवीन ओळखी होतील. हित शत्रूंवर मात करता येईल.
 • मिथुन:-
  मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. प्रेमात गैरसमजाला मध्ये आणू नका. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी झटाल. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक शांतता लाभेल.
 • कर्क:-
  घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. काही वेळेस माघार घेणे योग्य ठरेल. पोटाचे विकार संभवतात. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा.
 • सिंह:-
  कामाच्या ठिकाणी मानाची जागा पटकवाल. हातातील अधिकार वापरता येतील. कामाचा जोम वाढेल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. उत्तम गृहसौख्य लाभेल.
 • कन्या:-
  बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. अनावश्यक खर्च टाळावा. कसलीही खरेदी करतांना मागचा पुढचा विचार करावा. योग्य पथ्ये पाळावीत. उगाच वादात अडकू नये.
 • तूळ:-
  आत्मविश्वासाने कमव हाती घ्याल. फार हट्टीपणा करू नये. शारीरिक उष्णता वाढू शकते. कामात किरकोळ अडचणी येऊ शकतात. कामे जोमाने पार पडतील.
 • वृश्चिक:-
  संयम बाळगावा लागेल. घाईघाईने कोणतेही काम करू नका. पारंपरिक कामाकडे अधिक वेळ द्यावा लागेल. कुटुंबात मंगलकार्य होईल. धार्मिक स्थळी मदत कराल.
 • धनु:-
  कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. आवडते वाद्य वाजवायला मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी. खर्चाकडे लक्ष ठेवा.
 • मकर:-
  कष्टाला पर्याय नाही. प्रयत्नात कसूर करू नका. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यात वेळ घालवावा. क्षणिक आनंदात रमून जाल.
 • कुंभ:-
  जवळचा प्रवास मजेत होईल. सरकारी मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पाहावी लागेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक समाधान लाभेल.
 • मीन:-
  चंचलतेवर मात करावी. तुमची कला इतरांसमोर सादर करता येईल. घरातील वातावरण आनंदी असेल. नवीन आव्हानांचा स्वीकार करावा. अपवादांकडे दुर्लक्ष करावे.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 12:08 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 10 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०९ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, ०८ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०७ डिसेंबर २०१९
Just Now!
X