25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  वडिलांची मदत घ्यावी. व्यावसायिक प्रगतीकडे लक्ष ठेवावे. आत्मविश्वास बाळगून पुढे जाल. तुमची लोकप्रियता वाढेल. कर्तबगारीला चांगला वाव आहे.
 • वृषभ:-
  भावंडाचे उत्तम सहकार्य मिळेल. आनंदाने काम करण्यावर भर द्याल. प्रवासाचा योग येईल. हातून एखादे सत्कार्य घडेल. कामाचे कौतुक केले जाईल.
 • मिथुन:-
  अचानक धनलाभ संभवतो. नसते विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करावा. रेस, जुगार यातून फायदा संभवतो. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा.
 • कर्क:-
  महिलांचा घरात पगडा राहील. भागीदारीत समाधानी असाल. प्रवास मजेत होईल. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.
 • सिंह:-
  छुप्या शत्रूंवर बारीक लक्ष ठेवा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नये.
 • कन्या:-
  व्यापारीवर्गाला चांगला फायदा संभवतो. मनाजोगी खरेदी करता येईल. नसत्या वादात पडू नका. कागदपत्रे जपून ठेवावीत. छंद जोपासाल.
 • तूळ:-
  उघडपणे बोलणे टाळावे. घरगुती खरेदी कराल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. स्वच्छतेची कामे कराल.
 • वृश्चिक:-
  भावंडाना मदत कराल. मित्रांचे सहकार्य मिळेल. दिवस प्रवासात जाईल. कामाला योग्य गती येईल. कामातील बदल योग्य ठरेल.
 • धनु:-
  जुन्या कामात अडकून पडाल. अचानक धनलाभाची शक्यता. काटकसर करावी लागेल. वारसा हक्काची कामे निघतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल.
 • मकर:-
  जोडीदाराशी सल्लामसलत कराल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. हातातील कामात यश येईल. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
 • कुंभ:-
  उगाचच चिंता करत बसू नये. धार्मिक कामात सहभाग नोंदवा. वादात गुंतून पडू नका. हलक्या कानाच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे. झोपेचा त्रास जाणवेल.
 • मीन:-
  मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. मुलांच्या आनंदात दिवस मजेत जाईल. कामातून समाधान लाभेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on September 10, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 10 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०९ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, ०८ सप्टेबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०७ सप्टेंबर २०१९
Just Now!
X