01 June 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १२ मे २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कामाचा ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रांशी वाद वाढवू नयेत.

वृषभ:-आपले विचार कौशल्याने मांडाल. तुमच्यातील चतुरता दिसून येईल. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अचानक लाभ संभवतो.

मिथुन:-मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. कामात कसलीही कसूर करू नका. वातविकाराचा त्रास जाणवू शकतो.

कर्क:-स्त्रियांशी मैत्री कराल. खेळकरपणे दिवस घालवाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कामाचा उरक वाढवावा लागेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल.

सिंह:-काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. रेस, जुगार यांत अडकू नका. कलेला योग्य दाद मिळेल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.

कन्या:-कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुशलपणे आपले मत पट‍वून द्याल. उगाच शिस्तीचा बडगा आमलात आणू नये. प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास संभवतो.

तूळ:-भावंडांची काळजी लागून राहील. भागीदारीत अधिकाराने वागाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल.

वृश्चिक:-घरगुती प्रश्न चिघळू देवू नयेत. चांगला व्यावसायिक लाभ होईल. काहीसा मानसिक ताण जाणवेल. जोडीदाराचे बोलणे लाडिक वाटेल. चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल.

धनू:-दिवस सत्कारणी लावाल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल. प्रवास जपून करावा.

मकर:-तुमच्या बोलण्याला धार येईल. मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे. तुमच्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग होईल. आर्थिक गोष्टींचा पुनर्विचार करावा.

कुंभ:-रागावर नियंत्रण ठेवा. अती महत्त्वाकांक्षा चांगली नाही. तुमच्यातील धाडस वाढीस लागेल. उत्साहाने कामे पूर्ण कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

मीन:-डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गैरसमजुतीमुळे त्रास संभवतो. कामातील चलबिचलता टाळावी. व्यावसायिक बाबींचा सखोल विचार करावा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 12:55 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 12th may 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, ११ मे २०२०
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १० मे २०२०
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, ९ मे २०२०
Just Now!
X