• मेष:-
    चोरांपासून सावध राहावे. विरोधकांचे दडपण राहील. कामाचा ताण जाणवेल. मनाचे औदार्य दाखवाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.
  • वृषभ:-
    वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वादात अडकू नये. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता. प्रकृतीची काळजी घ्यावी.
  • मिथुन:-
    घरगुती जबाबदारी समर्थपणे पेलाल. खर्चाकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकार वापराल. तुमचा मान वाढेल. कामाचा जोम वाढेल.
  • कर्क:-
    भावनेला आवर घालावी लागेल. काही कामे वेळ काढतील. कामाची जबाबदारी वाढू शकते. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. अडथळ्यातून मार्ग काढाल.
  • सिंह:-
    शारीरिक कष्ट वाढू शकतात. कार्यप्रविणता दाखवाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. भावनेच्या भरात बोलतांना सारासार विचार करूनच बोलावे. डोकेदुखी सारखे त्रास जाणवू शकतात.
  • कन्या:-
    सामुदायिक वादात अडकू नका. प्रवासात काळजी घ्यावी. व्यावसायिक लाभाचा अधिक विचार कराल. मोठ्या लोकांच्या संगतीत रमाल. कोर्टाची कामे निघतील.
  • तुळ:-
    कामाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. अनुदानाची कामे होतील. कमिशनमधून फायदा संभवतो. कलागुणांना चांगला वाव मिळेल. सरकारी कामात विशेष लक्ष घालावे.
  • वृश्चिक:-
    औद्योगिकदृष्ट्या सतर्कता ठेवावी. वरिष्ठांशी बोलतांना नरमाई ठेवावी. गुरुकृपेचा लाभ होईल. मनाजोगी संगती लाभेल. वडिलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
  • धनु:-
    मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. प्रवासात सावधानता बाळगावी. शांतपणे विचार करून ते कृतीत आणाल. आवडत्या गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवितांना सतर्क राहावे.
  • मकर:-
    एकाच गोष्टीवर अडून राहू नका. मानसिक शांतता राखावी. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. कौटुंबिक सौख्याचा विचार करावा. खर्चाचा विचार करावा.
  • कुंभ:-
    पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोर्टाची कामे पुढे ढकलावीत. जोडीदाराचे म्हणणे समजून घ्यावे. कामे मनासारखी पार पडल्याने खूश असाल. चिडचिड करू नये.
  • मीन:-
    गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी. अति भावनिक होणे टाळावे. आवडते छंद जोपासावेत.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर