News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 मेष : आज आपल्याला अचानक धनलाभाचा योग आहे. आपल्या मित्रपरिवारांचे आपल्याला सहकार्य लाभेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्या घटना घडतील.

वृषभ : आज आपल्या रागावर आपण नियंत्रण ठेवावे म्हणजे कुटुंबातील कलह टळतील आपले निर्णय घरातील व्यक्तिंवर लादूनका. आर्थिक महत्वाचे व्यवहार टाळावेत. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल.

मिथुन : कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकुल आहे. संततीसंबंधीतील गुंतवणूकीचे व्यवहार आजआपण कराल. मित्रपरिवाराबरोबर शोभेच्या वस्तूची खरेदी कराल. आज पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील.

कर्क : आजचा आपला दिवस मानसिक प्रसन्नता देणार असेल. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने आपली कामे पूर्ण होतील.विद्यार्थांना शैक्षणिक प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपली मते डळमळीत ठेवू नका. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. प्रवास घडून येतील.

सिंह : आज आपण आर्थिक बाबींचे महत्वाचे निर्णय घेऊ नका. आपल्या संततीच्या उत्कर्षामुळे घरातील वातावरण अनुकूलराहिल. नोकरीत भाग्यकारक घटना घडतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल.

कन्या : आपल्या मित्रमैत्रिणींकडून आज आपल्याला सुवार्ता समजतील आपल्याला अचानक धनलाभाचा योग आहे. आपण न बोलता एखाद्या कामाची कृती केली तर त्या कामाच्या पूर्ततेमुळे आपली प्रशंसा होईल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल.

तूळ : भागिदारी व्यवसायात आपले कार्यक्षेत्र वाढल्यामुळे भरपूर काम करावे लागेल. आज आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर सहलीला जाल मिष्टान्न भोजनाचा योग आहे. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मन सैरभैर होणार्या घटना घडतील.

वृश्चिक : आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आपल्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागिदारीत व्यवसाय करणारांचे कार्यक्षेत्रवाढविण्यास भागिदाराकडून मोलाची मदत होईल. महत्वाचे पत्रव्यवहार होईल. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील.

धनू : आपले मनोबल वाढणार्या शुभघटना घडतील. आज आपण छोटे प्रवास कराल आपल्या भावंडांच्या गाठीभेटी होतील. व्यवसायात चांगला उत्क र्ष साधता येईल. अपेक्षित ठिकाणी बदली झाल्याने समाधान लाभेल.

मकर : आज आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला अचानक सहलीचा योग येईल. अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रवासयोगामुळेअपाल्याला अनपेक्षित विविध लाभ होतील. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल.

कुंभ : वैवाहिक मतभेद टाळावेत. आपल्या घरी आज अचानक पाहुणे येतील. आज आपल्याला काही महत्वाची कर्तव्य पारपाडावी लागतील. अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणाकडूनही मदतीची अपेक्षा ठेवू नका. स्वावलंबी राहा.

मीन : संततीच्या शैक्षणिक भाग्योद्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. घरात शोभेची मौल्यवान वस्तू खरेदी केलीजाईल. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 15 december 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ डिसेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १३ डिसेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ डिसेंबर २०२०
Just Now!
X