मेष

गणपती अथर्व शीर्षकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

गणपती मंदिरात नैवेद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग –ऑफ व्हाईट

कर्क

गणपती मंदिरात गुलाबाचे फुल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदार्‍या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

सिंह

आज गणेश स्तुती म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडीत नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतीत. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल.
आजचा रंग -केशरी

कन्या

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे, ओटी भरावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको.
आजचा रंग –निळा

तुळ

महादेवाच्या मंदिरात एक मूठ तांदूळ अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांशी निगडीत एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ॐ श्री क्लींम नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –केशरी

धनु

कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. मुलांशी निगडीत किंवा घरांतील धाकट्या भावंडांशी निगडीत चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग –राखाडी

मकर

गणपती अष्टक म्हणावे, गणपती स्तोत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरूवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते.
आजचा रंग –पांढरा

कुंभ

महादेवाचे स्मरण करून ‘ॐ’ या बीज मंत्राचे उच्चारण करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. भावंडांशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग- मोरपंखी

मीन

आज दिवसभर अथर्व शीर्ष ऐकावे व पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडीत व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांसाठी उत्तम दिवस आहे. धन स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu